पहा राज्याच्या राजकारणात नक्की काय सुरू आहे. कोणी केली टीका कोणी दिलं उत्तर. पहा फक्त टॉप 9 न्यूजमध्ये
लवकरात लवकर आनंदाचा शिधा लोकांना मिळावा यासाठी शिधा ऑफलाईन पद्धतीने द्या अशा सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे औरंगाबाद दौऱ्यावर असणार आहेत. ते तेथे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा करतील. तर शिवसेनेच्या फूटूनंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा आहे. तर आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टीका करताना सरकारकडून मदतीबाबत फक्त घोषणाच केल्या जातात असे त्यांनी म्हटलं आहे. तर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी देखिल आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली आहे. यादरम्यान उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावरून शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सय्यद यांनी, ठाकरे यांना दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांना यश मिळो असेही म्हटलं आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याचा दौरा याआधीच करायला हवा होता असेही म्हटलं आहे. राज्य शासनाच्या दिवाळी कीट वाटपाचा राज्यभरात बोजारा उडाला आहे. कोठे शिधा पोहचलेली नाही. तर कुठे काही साहीत्य आहे आणि काही नाही अशी अवस्था दिवाळी कीटची आहे. त्यामुळे लवकरात लवकर आनंदाचा शिधा लोकांना मिळावा यासाठी शिधा ऑफलाईन पद्धतीने द्या अशा सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या आहेत.