ढाल-तलवार हे चिन्ह छत्रपती शिवाजी महाराज यांची निशाणी आहे – एकनाथ शिंदे , याबातमीसह पहा टॉप 9 न्यूज
शिंदे गटाला निवडणूक आयोगाने ढाल-तलवार हे चिन्ह दिलं आहे. त्यामुळे शिंदे गटाला मिळालेले ढाल-तलवार चिन्ह हे ठाकरेंच्या मशालीला अव्हाण देणार आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर आपली प्रतिक्रीया दिली. तसेच ढाल-तलवार हे चिन्ह छत्रपती शिवाजी महाराज यांची निशाणी आहे.
शिवसेनेवर ताबा मिळविण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासह शिंदे गट सक्रीय झाला होता. त्यानंतर खरी शिवसेना कोणाची हा मुद्दा निवडणूक आयोगाकडे गेला आणि आयोगाने शिवसेनेचं चिन्ह आणि नाव दोन्ही ही गोठवलं. यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आलं. त्यापाठोपाठ आता शिंदे गटाला ही चिन्ह मिळालं आहे. शिंदे गटाला निवडणूक आयोगाने ढाल-तलवार हे चिन्ह दिलं आहे. त्यामुळे शिंदे गटाला मिळालेले ढाल-तलवार चिन्ह हे ठाकरेंच्या मशालीला अव्हाण देणार आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर आपली प्रतिक्रीया दिली. तसेच ढाल-तलवार हे चिन्ह छत्रपती शिवाजी महाराज यांची निशाणी आहे. आम्हाला मराठमोळी निशाणी मिळाली आहे. तर ही निशाणी लोकांपर्यंत पोहचली देखिल आहे असे ते म्हणाले. त्याचबरोबर आमची बाळासाहेंबाची शिवसेना असून समोर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्याचे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. आमच्याकडे मशाल असून तलवार येण्याच्या आत तुम्ही जळून खाक व्हाल अशी टीका शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर केली आहे.