लटके यांच्या राजीनाम्यावरून राजकीय वातावरण गरम होताना दिसत आहे, यासह इतर राजकीय बातम्यापहा टॉप 9 न्यूजमध्ये
भाजपचे माजी गट नेते प्रभाकर चव्हाण यांनी लटके यांच्यावरून ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. तसेच ऋतुजा लटके यांनी दोन वेळा राजीनामा का दिला असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तर लटके यांच्या राजीनाम्यावरून भाजपवर खापर फोडणे हे बरोबर नसल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
अंधेरी पोटनिवडणूकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्यावरून आता राजकीय वातावरण गरम होताना दिसत आहे. लटकेंवरून राजकीय खटके उडत आहे. दरम्यान लटके यांचा बीएमसी कर्मचारी पदाचा राजीनामा अजूनही मंजूर झालेला नाही. त्यामुळे ठाकरे अडणीत आले आहेत. अंधेरी पोटनिवडणूक आधीच ऋतुजा लटके यांच्यावरून पेच निर्माण झाल्याने ठाकरे गटाचा प्लॅन बी तयार आहे. लटके यांच्या ऐवजी कमलेश राय किंवा उप विभाग संघटक प्रमोद सावंत यांची नाव म्हणून चर्चेत. यादरम्यान भाजपचे माजी गट नेते प्रभाकर चव्हाण यांनी लटके यांच्यावरून ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. तसेच ऋतुजा लटके यांनी दोन वेळा राजीनामा का दिला असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तर लटके यांच्या राजीनाम्यावरून भाजपवर खापर फोडणे हे बरोबर नसल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. तर ठाकरे गटाकडून आणि अनिल परब यांनी केलेल्या आरोपानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचा कोणावरही दबाव नाही. राजीनामे स्वीकारण्याचे काही नियम असतात. त्या नियमांप्रमाणे राजीमाना हा घेतला जाईल असेही फडणवीस म्हणाले.