टॉप 9 न्यूज – दसरा मेळाव्याच्या जय्यत तयारीच्या बातम्या

| Updated on: Oct 04, 2022 | 9:59 PM

शिंदे गटाची अंतिम तयारी शेवटच्या टप्यात आली आहे. तर शिंदेच्या मेळाव्याची सुरूवात 51 फुटी तलवारिची पूजा करण्यात येणार आहे.

शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची बीकेसी मैदानावर जोरदार तयारी करण्यात आली आहे. तर या दसरा मेळाव्याला 3 लाख लोकांची गर्दी जमवण्याचं टार्गेट शिंदे गटाकडे असणार आहे. तर राज्याच्या विविध भागातून शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला जाण्यासाठी कार्यकर्ते रवाना. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला जाण्यासाठी 1800 बसेसची सोय करण्यात आली आहे. तर शिंदे गटाकडून शिंदेच्या आवाजात शिवसैनिकांना आमंत्रण देण्यात आले आहे. तर शिंदे गटाची अंतिम तयारी शेवटच्या टप्यात आली आहे. तर शिंदेच्या मेळाव्याची सुरूवात 51 फुटी तलवारिची पूजा करण्यात येणार आहे. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला अर्जून खोतकर यांचे हजारो कार्यकर्ते जालन्यातून निघाले आहेत. दरम्यान दसरा मेळाव्याला जाणाऱ्या अर्जून खोतकर यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीचा अपघात. तर शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. शिंदे गटाचा दसरा मेळावा म्हणजे इव्हेंट असल्याचं परब म्हणाले आहे.

 

Published on: Oct 04, 2022 09:59 PM
पहिल्यांदाच दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे यांची तोफ धडधडणार
शिंदे गटासह उद्धव ठाकरें कडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी; पहा यासह 10 च्या 10 हेडलाईन्स