Aditya Thackeray : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यूपीच्या दौऱ्यावर ; लवकरच घेणार प्रभू रामाचे दर्शन
आदित्य ठाकरे याच्याबरोबर या दौऱ्यात महाराष्ट्रातून जवळपास 1200 शिवसैनिक सहभागी झाले आहेत. अयोध्या ही कोणतीही राजकीय भूमी नसून ते राम जन्मभूमी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुंबई – शिवसेना नेते व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. लवकर आदित्य ठाकरे अयोध्येत जाऊन राम लल्लाचे दर्शन घेणार आहे. या दौऱ्यात शिवसैनिकानीं(Shiv sena) मोठ्या जल्लोषात त्याचे स्वागत केले. आज सायंकाळी 5:30 ला राम मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. त्यानंतर शरयू नदीची आरती करणार आहेत. आदित्य ठाकरे याच्याबरोबर या दौऱ्यात महाराष्ट्रातून जवळपास 1200 शिवसैनिक सहभागी झाले आहेत. अयोध्या ही कोणतीही राजकीय भूमी नसून ते राम जन्मभूमी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांनी उत्तरप्रदेश (UP) इस्कॉन मंदिरापूजा करणार आहेत. आदित्य ठाकरे याचा अयोध्येचा हा तिसरा दौरा आहे.
Published on: Jun 15, 2022 04:00 PM