भावली धबधब्यावर पर्यटकांची गर्दी, कोसळणाऱ्या धबधब्याने बहरलं निसर्ग सौंदर्य

| Updated on: Jul 24, 2023 | 2:47 PM

इगतपुरी तालुक्याचा स्वर्ग समजला जाणारा भावली धबधबा बहरला आहे. इगतपुरी नगरपरिषद तलावाच्या मागे दडून बसलेला धबधब्याचा आनंद घ्यायला रविवारी पर्यटकांनी तुफान गर्दी केली.

नाशिक, 24 जुलै 2023 | गेल्या काही दिवसापासून इगतपुरी तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील धरण साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. या पावसामुळे ठिकठिकाणी डोंगर उतारावरुन धबधबे वाहू लागल्याने पर्यटकांची गर्दी वाढत आहे. इगतपुरी तालुक्याचा स्वर्ग समजला जाणारा भावली धबधबा बहरला आहे. इगतपुरी नगरपरिषद तलावाच्या मागे दडून बसलेला धबधब्याचा आनंद घ्यायला रविवारी पर्यटकांनी तुफान गर्दी केली. महाराष्ट्रातून पर्यटक याठिकाणी विकेंड साजरा करण्यासाठी आले होते.

Published on: Jul 24, 2023 02:47 PM
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर असाल तर महत्वाची बातमी; प्रवासा दरम्यान खाणं आणि पिण्यासाठी पाणी सोबत घ्याच
निधी वाटपाच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस भडकले; म्हणाले, ‘हा शहाणपणा तेव्हाच्या सरकारला शिकवायला हवा होता’