रविवारचा आनंद घेण्यासाठी पर्यटक लोणावळ्यात, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंटवर पर्यटकांची तुफान गर्दी
रविवारच्या सुट्टीचा आणि निर्सगाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले आहेत. भुशी धरण ओव्हर फ्लो झाल्यावर पर्यटकांची पावले आपसूकच लाईन्स आणि टायगर पॉईंटवर वळत आहेत.
पुणे, 30 जुलै, 2023 | रविवारच्य सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक घराबाहेर पडले आहेत. रविवारच्या सुट्टीचा आणि निर्सगाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले आहेत. भुशी धरण ओव्हर फ्लो झाल्यावर पर्यटकांची पावले आपसूकच लाईन्स आणि टायगर पॉईंटवर वळत आहेत. टायगर पॉईंट अक्षरशः धुक्यात हरवून गेलाय. तर थंडगार हवा, कोसळणारा पाऊस यामुळे पर्यटकांना काश्मीरला आल्यासारखं वाटत आहे. पुणे, मुंबईसह राज्यभरातून हजारो पर्यटक लोणावळ्यात गर्दी केल्याचं चित्र आहे.
Published on: Jul 30, 2023 01:51 PM