महाराष्ट्रात मोठी दुर्घटना टळली! 500 पर्यटकांचा जीव का आला मुठीत? कुठं घडली घटना?
येथे रविवारची सुट्टी आणि काजवा महोत्सव असल्याने पर्यटकांची धरण परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. काजवा महोत्सवाला 500 च्यावर पर्यटकांनी हजेरी लावली होती. मात्र अचानक आलेल्या वादळी वारा व मुसळधार पावसामुळे हे पर्यटक ‘सांधण दरी’तच अडकले.
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील ‘सांधण व्हॅली’ अर्थात ‘सांधण दरी’त मोठा अनर्थ होता होता टळला. त्यामुळे एकाच वेळी 500 च्यावर पर्यटकांनी देवदूत बनून आलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले. येथे रविवारची सुट्टी आणि काजवा महोत्सव असल्याने पर्यटकांची धरण परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. काजवा महोत्सवाला 500 च्यावर पर्यटकांनी हजेरी लावली होती. मात्र अचानक आलेल्या वादळी वारा व मुसळधार पावसामुळे हे पर्यटक ‘सांधण दरी’तच अडकले. वेळीच मदत पोहचल्याने दरीत अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. भंडारदरा परिसरातील सांदण दरी जगप्रसिद्ध आहे. येथे अडकलेल्यांची पर्यटकांची सुटका करण्यात आली. पाऊस आणि वादळी वारे यामुळं तब्बल 500 हून अधिक पर्यटक सांदण दरीत अडकले होते. रविवारची सुट्टी असल्यानं पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. या पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.