Nagpur | नागपुरात नव्या निर्बंधांत वेळ कमी झाल्याने व्यापारी नाराज
व्यवसाय करायला वेळ कमी मिळत असल्याने व्यापारी नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळते. हे निर्बंध 5 जुलैपर्यंत लागू राहणार आहेत. (Traders unhappy over new restrictions in Nagpur)
नागपूर : नागपुरात आजपासून नवीन निर्बंध लागू झाले आहेत. त्यामुळे नागपूरच्या सीताबर्डी मार्केटमध्ये आज सकाळपासून लगबग पाहायला मिळत आहे. आजपासून बाजार 4 वाजेपर्यंतच सुरू राहणार असल्याने व्यवसाय करणारे सकाळी लवकर पोहचले. नेहमी 11 वाजताच्या दरम्यान सुरु होणारा बाजार आज सकाळीच सुरु झाला. वेळ कमी असल्याने व्यापाऱ्यांना लगबग करावी लागत आहे. व्यवसाय करायला वेळ कमी मिळत असल्याने व्यापारी नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळते. हे निर्बंध 5 जुलैपर्यंत लागू राहणार आहेत.