मुंबई-पूर्व, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी
गेल्या काही तासांपासून मुंबईसह परिसरात पावसाला सुरुवात झाली असून त्याचा फटका वाहतूक व्यवस्थेला बसला आहे.
गेल्या काही तासांपासून मुंबईसह परिसरात पावसाला सुरुवात झाली असून त्याचा फटका वाहतूक व्यवस्थेला बसला आहे. पावसामुळे मुंबईतील पूर्व आणि द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाली असून त्याचा फटका प्रवाशांना बसला आहे. महामार्गावर लाबंच लांब रांगा लागल्या असून वाहनेही धिम्या गतीने सुरु आहे. सकाळी पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे त्याचा फटका एका रुग्णवाहिकेलाही बसला आहे. रुग्णवाहिकी वाहतूक कोंडीत अडकल्याने खूप वेळ रुग्णवाहिका थांबवून ठेवावी लागली होती. द्रुतगती महामार्गावर वाहनांची कोंडी झाल्याचा मोठा फटका चाकरमान्यांना बसला आहे.त्यामुळे अनेकांची कामं खोळंबली असून महामार्ग परिसरात पावसाची संततधार सुरुच असल्याने आणि काही काळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार असल्याचे दिसून येत आहे.
Published on: Sep 16, 2022 12:31 PM