एसटी बसमध्ये छत्री घेऊन करावा लागतोय प्रवास; व्हिडीओ पाहिला का?

| Updated on: Jul 28, 2023 | 8:12 AM

राज्यात सध्या काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी संथ गतीने पाऊस पडत आहे. मात्र या पावसात राज्यातल्या एसटी बसची दुरावस्था समोर येत आहे. गडचिरोलीतल्या एसटी बसचे छप्पर उडाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नांदेड मधल्या एसटी बसची दुरावस्था समोर आली आहे.

नांदेड, 28 जुलै 2023 | राज्यात सध्या काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी संथ गतीने पाऊस पडत आहे. मात्र या पावसात राज्यातल्या एसटी बसची दुरावस्था समोर येत आहे. गडचिरोलीतल्या एसटी बसचे छप्पर उडाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नांदेड मधल्या एसटी बसची दुरावस्था समोर आली आहे. नांदेड येथे चक्क एसटी बसमध्ये छत्री घेऊन प्रवाशी प्रवास करत आहेत. दरम्यान सदर व्हिडीओ हा देगलूर आगारातील एसटी बसचा आहे. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. देगलूर मुक्रमाबाद जाणाऱ्या बसचा पत्रा गळत असल्यामुळे एसटीत पाणीच पाणी झालंय.त्यामुळे प्रवाशांना छत्री घेऊन प्रवास करावा लागत आहे. गळक्या एसटी बसमधून प्रवास करावा लागल्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला जातोय.

Published on: Jul 28, 2023 08:12 AM
“उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे, लवकर जायचंय”; अनिल परब अन् नीलम गोऱ्हे यांच्यात खडाजंगी
शिक्षणासाठी गुडघाभर चिखलातून पायपीट, जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास