“एक उमदा मराठी उद्योजक…”, शरद पवार यांच्याकडून नितीन देसाई यांना श्रद्धांजली अर्पण
कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. नितीन देसाई यांच्या अकाली मृत्यूमुळे अनेकांना धक्का बसला आहे. अनेक स्तरावरून नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील ट्विट करत नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मुंबई, 02 ऑगस्ट 2023 | कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. नितीन देसाई यांच्या अकाली मृत्यूमुळे अनेकांना धक्का बसला आहे. अनेक स्तरावरून नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील ट्विट करत नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे. शरद पवार यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, “प्रख्यात कलादिग्दर्शक निर्माते नितीन चंद्रकांत देसाईंचे निधन अत्यंत दु:खदायक आणि वेदनादायक आहे. प्रचंड आत्मविश्वास, नाविन्याची ओढ आणि मेहनत करण्याची तयारी असलेला एक उमदा मराठी उद्योजक आपण गमावला. मराठी सिनेसृष्टीबरोबर सर्वच क्षेत्राला बसलेला हा मोठा धक्का आहे.”
Published on: Aug 02, 2023 02:18 PM