त्र्यंबकेश्वर मंदिरातील ‘त्या’ घटनेवर राज ठाकरे यांची सडेतोड प्रतिक्रिया; “तो निर्णय…, बाहेरच्यांची लुडबूड नको”
उरुस आयोजकांनी पुढच्या वर्षीपासून त्र्यंबकेश्वराला धूप न दाखवण्याचा निर्णय घेतला. मात्र यानंतरही तेथे शुद्धीकरण सारखे राजकारण झाले. यावरून मोठ्या प्रमाणावर राजकारण तापलं. याचमुद्द्यावरू मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अनेकांना झापलं आहे.
नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिरातील धूप दाखवण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर उरुस आयोजकांनी पुढच्या वर्षीपासून त्र्यंबकेश्वराला धूप न दाखवण्याचा निर्णय घेतला. मात्र यानंतरही तेथे शुद्धीकरण सारखे राजकारण झाले. यावरून मोठ्या प्रमाणावर राजकारण तापलं. याचमुद्द्यावरू मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अनेकांना झापलं आहे. तर हा प्रश्न गावकरी आणि तेथील संस्थानाचा आहे. तो त्यांनीच सोडवायचा. त्यात यात बाहेरच्या लोकांनी तिथे जाऊन आंदोलन करण्याची गरज नाही. चुकीच्या गोष्टींवर प्रहार करणं गरजेचं आहे. पण जाणूनबुजून काही खोदून काढायचं याला काही अर्थ नाही असे ते म्हणालेत. याबरोबरच महाराष्ट्रात अशी अनेक मंदिरं आहेत किंवा अशा मशिदी आहेत जिथे हिंदू-मुस्लीम एकोप्याने राहतात. मला वाटतं जे परंपरा सुरु ठेवली पाहिजे. इतर धर्माचा माणूस आपल्या मंदिरात आला तर इतका भ्रष्ट होणारा इतका कमकुवत धर्म आपला आहे का? असा परखड सवाल करत त्यांनी त्र्यंबकेश्वर प्रकरणावरुन रान उठवणाऱ्यांना फटकारलं आहे.