अबब! सांगलीच्या कृष्णा नदी काठी दोन अजस्त्र मगरीचे दर्शन; मगरींना पाहून नागरीक भयभीत

| Updated on: Jul 18, 2022 | 11:40 PM

बोटीतून रेस्क्यू टीम नदीतून जात असताना दोन मगरीचे दर्शन झाले. यावेळी एक मगर गवतात बसलेली होती. तर एक मगर पाण्याचा कडेला बसलेली होती. एक 9 फुटाची मगर तर दुसरी 12 फुटी मगर होती.

सांगली : सांगलीच्या(Sangli) कृष्णा नदीच्या(Krishna river) पाणी पातळी मध्ये हळूहळू घट होऊ लागली आहे. त्यामुळे नदी मधील मगरी(crocodiles) नदीच्या काठावर येऊन बसत आहेत. आज सकाळी बोटीतून रेस्क्यू टीम नदीतून जात असताना दोन मगरीचे दर्शन झाले. यावेळी एक मगर गवतात बसलेली होती. तर एक मगर पाण्याचा कडेला बसलेली होती. एक 9 फुटाची मगर तर दुसरी 12 फुटी मगर होती. मात्र या अजस्त्र मगरीला पाहून नागरीक भयभीत झाले आहेत.

Published on: Jul 18, 2022 11:40 PM
Special Report : 40 आमदारांपाठोपाठ आता शिवसेनेचे 12 खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील
अर्धे शरीर पाण्याखाली टाकून पाईप लाईन दुरुस्तीचे काम; BMC कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल