नागपूरमध्ये दुमजली इमारत नाल्यात कोसळली, घरातलं साहित्य गेलं वाहून

| Updated on: Aug 02, 2023 | 9:22 AM

नागपूरमध्ये दुमजली इमारत नाल्यात कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत सुदैवाने जिवीतहानी झालेली नाही. मात्र घरातील साहित्य नाल्यात वाहून गेलं आहे.

नागपूर, 02 ऑगस्ट 2023 | नागपूर मध्ये दुमजली इमारत नाल्यात कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत सुदैवाने जिवीतहानी झालेली नाही. मात्र घरातील साहित्य नाल्यात वाहून गेलं आहे. टेका नई बस्ती येथील चिराग अली चौकात मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. चांभार नाल्याच्या भिंतीलागत असलेले दुमजली इमारत अचानक नाल्यात कोसळली.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. इमारत पडत असल्याचा आवाज येताच सर्वजण बाहेर पडल्याने थोडक्यात बचावले. शकील अन्सारी यांचे हे घर असून इमारत कोसळत असताना कुटुंबातील सहा सदस्य घरातच होते. इमारत पडल्याचा आवाज येताच परिसरातील नागरिकांनी अन्सारी यांच्या घराकडे धाव घेतली. या वस्तीतून मोठा नाला वाहतो, या नाल्याला लागूनच लोकांची घरे आहेत.

Published on: Aug 02, 2023 09:22 AM
साता समुद्रपार असलेलं जपान शहर आलं थेट महाराष्ट्रातील या जिल्ह्यात? काय आहे प्रकरण?
‘या’ चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, राज्यात पुन्हा एकदा धुंवाधार पावसाची शक्यता, मुंबई पुण्याला कोणता अलर्ट?