आरे कॉलनीत दोन गटात राडा, पोलिसांनी अनेकांना घेतले ताब्यात
आरे कॉलनीमध्ये दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे. गौतम नगर परिसरातील ही घटना आहे. शिवमंदिरातील कळस यात्रेदरम्यान हा प्रकार घडला आहे.
मुंबई : आरे कॉलनीमध्ये दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे. गौतम नगर परिसरातील ही घटना आहे. शिवमंदिरातील कळस यात्रेदरम्यान हा प्रकार घडला आहे. रविवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान या प्रकरणात आरे पोलिसांनी कारवाई केली असून, अनेकांना ताब्यात घेतले आहे. परिसरात तणावपूर्ण शांतता असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.