RBI Withdraw 2000 Notes : आरबीआय ऐतिहासिक निर्णय; मंदिरांच्या दानपेटींवर काय होईल परिणाम?
येत्या ३० सप्टेंबरपर्यंत ग्राहकांना दोन हजार रुपयांच्या नोटा वापरता येणार आहे. तसेच दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांना तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. आरबीआयने दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबवली असून या नोटा आता चलनातून बाद होणार आहे.
शिर्डी : भारतात लागू असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा मोठा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. येत्या ३० सप्टेंबरपर्यंत ग्राहकांना दोन हजार रुपयांच्या नोटा वापरता येणार आहे. तसेच दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांना तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. आरबीआयने दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबवली असून या नोटा आता चलनातून बाद होणार आहे. त्यानंतर याचा कोणा कोणाला फटका बसणार असा सवाल आता अनेकांना पडला आहे. तर देशभरातील अनेक धार्मिक-तिर्थस्थळांच्या दानपेटींचा प्रश्न प्रकर्शाने समोर आला आहे. असाच प्रश्न आता शिर्डीतील साई संस्थानबाबत उपस्थित केला जात आहे. देशभरातून दररोज हजारो भाविक साईंच्या दर्शनाला शिर्डीत हजेरी लावतात. दहा रुपयांपासून लाखोचं दान साईंच्या झोळीत अर्पण करतात. या आलेल्या दानाची मोजदाद आठवड्यातून मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवशी केली जाते. साईबाबा संस्थान दानाची मोजदाद केल्यावर कुठलीही रक्कम स्वतःकडे न ठेवता थेट बँकेत जमा करते. त्यामुळे आता 2 हजार रुपयांच्या नोटा संदर्भात झालेल्या निर्णयामुळे साईबाबा संस्थान कोणतीही अडचण नसून आलेल्या नोटा या थेट बँकेत जमा होतील. मात्र दोन हजार रुपयांच्या नोटा दानात येण्याच प्रमाण मागील काही महिन्यांपासून अत्यल्प असून मागील नोटबंदीनंतर हजार आणि पाचशे च्या नोटा मोठ्या प्रमाणात दानात उपलब्ध झाल्या होत्या. त्यामुळे आता झालेल्या निर्णयानंतर दोन हजारांच्या नोटाचे दान आगामी काळात वाढणार की घटणार हे पाहण महत्वाच ठरणार आहे.