पुण्यातून बाहेर पडताय तर थांबा! आधी पहा कुठं आहे वाहतूक कोंडी?

| Updated on: Jun 24, 2023 | 12:13 PM

लोक रविवार असल्याने घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पुणे-नाशिक महामार्गावर चाकण येथे रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून येते वाहनाच्या रांगा लागल्या आहेत.

चाकण/पुणे : रविवार आला म्हटलं की पुण्यातील लोकांना सगळ्यात आधी तोंड द्यावं लागतं ते वाहतूक कोंडी. येथे वाहतूक कोंडी ही मोठी समस्या झाली आहे. आता ही लोक रविवार असल्याने घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पुणे-नाशिक महामार्गावर चाकण येथे रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून येते वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. वाहनाच्या रांगा तर तब्बल पाच ते सहा किलोमीटर पर्यंत लागल्या आहेत. तर चाकण शहर ते आळंदी फाट्या पर्यंत मोठी वाहतूक कोंडी झालेली पहायला मिळत आहे. दरम्यान सध्या येथे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

Published on: Jun 24, 2023 12:13 PM
Mumbai Rain : पाऊस आला रे…; अखेर मुंबईसह उपनगरात पावसाला सुरूवात
Maharashtra Politics : फडणवीस यांच्या टीकेवर काँग्रेस नेत्याचा पलटवार; म्हणाला, ‘फडणवीस घाबरलेत…’