दोन परप्रांतीय तरुण लॅपटॉपमध्ये संशयास्पद कागदपत्रे? एटीएस कारवाई, दोघा तरुणांना घेतलं ताब्यात
तसेच देशविरोधी कारवाई केल्याच्या संशयावरून दोन तरुणांना घेण्यात ताब्यात आलं आहे. तर त्यांच्याकडून काही संशयास्पद कागदपत्रे आढळून आली आहेत.
पुणे, 19 जुलै 2023 | पुण्यातील कोथरुडमध्ये दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. तसेच देशविरोधी कारवाई केल्याच्या संशयावरून दोन तरुणांना घेण्यात ताब्यात आलं आहे. तर त्यांच्याकडून काही संशयास्पद कागदपत्रे आढळून आली आहेत. याबाबत अधिक तपास ATS करत आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोथरुडमध्ये दोन परप्रांतीय तरुण संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामाहितीच्या आधारे मंगळवारी रात्री त्या दोघांना पुणे पोलीस आणि ATS ने संयुक्त करवाई करत ताब्यात घेतले. त्यांची झाडाझडती घेतली असता लॅपटॉप सापडून आला. तर त्या लॅपटॉपमध्ये काही संशयास्पद कागदपत्रे आढळून आले आहेत. तसेच त्यांच्याकडे जिवंत काडतुसे देखील सापडेली आहेत. मात्र पिस्तुल मिळालेलं नाही.
Published on: Jul 19, 2023 11:16 AM