“भ्रष्टाचाराविरोधात मोर्चाचे ठाकरे गटाचे लॉजिक काय?”, शिवसेनेच्या नेत्याची टीका
मुंबईतील कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी काल ईडीने 16 ठिकाणी छापेमारी केली. त्यात ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय, ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीनं धाड टाकली. कोरोना काळातील लाईफलाईन कंपनी घोटाळा प्रकरणी ही धाड टाकण्यात आली. सनदी अधिकारी संजीव जैसवाल आणि खासदार संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या घरी आणि ऑफिसमध्ये ईडीनं धाड टाकली. यामुळे काल राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. यावर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : मुंबईतील कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी काल ईडीने 16 ठिकाणी छापेमारी केली. त्यात ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय, ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीनं धाड टाकली. कोरोना काळातील लाईफलाईन कंपनी घोटाळा प्रकरणी ही धाड टाकण्यात आली. सनदी अधिकारी संजीव जैसवाल आणि खासदार संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या घरी आणि ऑफिसमध्ये ईडीनं धाड टाकली. यामुळे काल राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. यावर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “उद्धव ठाकरे गट एक जुलैला महानगरपालिके वरती मोर्चा काढणार आहे.हा मोर्चा भ्रष्टाचाराविरोधात असेल तर आज छापेमारी झाली ते काय आहे? छापेमारी झाली त्यात यांच्या जवळचे आहेत, अशी चर्चा आहे. मग एक तारखेला मोर्चा काढण्याचे लॉजिक काय आहे. आजच्या छापेमारीचे उत्तर एक जुलै रोजी मोर्चा द्याव लागेल. भ्रष्टाचाराविरोधात मोर्चाचे ठाकरे गटाचे लॉजिक काय?” असा सवाल उदय सामंत यांनी केला आहे.