“हिंमत असेल तर अजितदादा यांना गद्दार म्हणून दाखवा”, शिंदे गटाच्या नेत्यांचं ठाकरे गटाला आव्हान

| Updated on: Jul 24, 2023 | 9:30 AM

राष्ट्रवादीचे नेचे अजित पवार सत्तेत सामील होताच शिंदे गट गद्दार शब्दावरून आक्रमक झाला आहे. आम्हाला गद्दार बोलणारे आज मविआला कंटाळून आमच्यासोबत आले आहेत, असं शिंदे गट म्हणत आहे.

मुंबई, 24 जुलै 2023 | राष्ट्रवादीचे नेचे अजित पवार आपल्या काही सहकाऱ्यांसोबत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर शिंदे गट महाविकास आघाडीवर आक्रमक होताना दिसला. आम्हाला गद्दार बोलणारे आज मविआला कंटाळून आमच्यासोबत सत्तेत सामील झाले असं शिंदे गट म्हणत आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, “हिंमत असेल तर अजित पवारांना गद्दार बोलून दाखवा. अजितदादा आमच्यासोबत आल्यापासून गद्दार बोलणं बंद झालं आहे. त्याबद्दल मी अजितदादांचं आभारच मानतो. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यामुळे काल काही लोक बुके घेऊन त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आले होते.”

‘केवळ टीका करण्यासाठी माध्यमांसमोर…’; खासदार सुनिल तटकरे यांचा राऊत यांच्यावर निशाना
‘राऊताच्या सगळ्या हवेतल्या गप्पा, पुरावे आहेत तर सांगा’; शंभुराज देसाई यांचे थेट राऊत यांना चॅलेंज