Uday Samant | संजय राठोडांना तपास यंत्रणांकडून क्लीन चिट, आरोपात तथ्य नाही-उदय सामंत

| Updated on: Aug 09, 2022 | 6:07 PM

'संजय राठोडांना तपास यंत्रणांकडून क्लीन चिट, आरोपात तथ्य नाही. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना स्थान दिलं जाईल, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंतांनी दिली आहे, असं उदय सामंत म्हणाते.

मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) पार पडला. यात महिलांना स्थान नसल्यानं विरोधकांनी चौफेर टीका सुरू केली आहे. तर संजय राठोड यांना स्थान दिल्यानंही टीका करण्यात येत आहे. यावर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘संजय राठोडांना तपास यंत्रणांकडून क्लीन चिट, आरोपात तथ्य नाही. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना स्थान दिलं जाईल, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. अठरा आमदारांमध्ये एकही महिला आमदाराला मंत्री करावं असं वाटलं नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या चतुर्वेदी यांनी दिली आहे. तर संजय राठोड यांच्याविषयी अनेक मोठ्या गोष्टी बोलण्यात आल्या. पण, सर्वात आधी राठोड यांनाच शपथ देण्यात आली,’ अशी टीका चतुर्वेदी यांनी केली आहे.

Published on: Aug 09, 2022 06:07 PM
Jayant Patil | अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे हाल सुरु आहेत, आता तात्काळ खातेवाटप करा, जयंत पाटील यांनी टोचले कान
Kolhapur : झाडावर अडकलेल्या वानराची दोरीच्या सहाय्याने सुटका, जवानांच्या प्रयत्नांना यश