Uday Samant | अनेक जण तर घोषणा सुद्धा देत नाहीत, कारण त्यापैकी अनेक जण नाराज- tv9
उदय सामंत यांनी घोषणांवर बोलताना, घोषणा देणाऱ्यांमध्ये कितीतरी लोक नाराज आहेत. किती लोक नाईलाजाने त्या ठिकाणी बसलेले आहेत.
अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांचे नामोहरण करण्यासाठी वेगवेगळे नारे देताना दिसत आहेत. विरोधकांकडून आधी
50 खोके एकदम ओके आणि आता गद्दारांच्या हाती काय? ताठ वाटी… ताटवाटी… जय भवानी जय भवानी अशा घोषणा दिल्या जात आहेत. याबाबत विचारले असता उदय सामंत यांनी त्यावर बोलताना, घोषणा देणाऱ्यांमध्ये कितीतरी लोक नाराज आहेत. किती लोक नाईलाजाने त्या ठिकाणी बसलेले आहेत. हे लक्षात येत. तर काही लोक घोषणा पण देत नाही आता उद्यापासून देतील मी सांगितल्या नंतर पण काही लोक घोषणा पण देत नाहीत. विकासावर विश्वास ठेवून अनेकांनी शिंदे साहेबांसोबत चर्चा केलेली आहे. जे घोषणा देत होते त्यातील ही काही आमदार हे शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये असल्याचेही सामंत म्हणाले.
Published on: Aug 18, 2022 04:48 PM