“ठाकरे गटाकडून माझ्यावरही हल्ल्याचा प्रयत्न”, कोणी केला आरोप?
शाखा पाडताना बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवर हातोडा मारला गेल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मनपा अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे.
मुंबई : शाखा पाडताना बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवर हातोडा मारला गेल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मनपा अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. वांद्रे विधानसभेच्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात उदय सामंत यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केला आहे. ठाकरे गटाने माझ्यावरही हल्ल्याचा प्रयत्न केला होता, पण माझ्यासारखे कार्यकर्ते अशांना घाबरत नाहीत तर उलटा अजून हिंमतीने उभे राहतो,असं उदय सामंत म्हणाले.
Published on: Jun 28, 2023 02:47 PM