Uday Samant: सभेमध्ये कार्यकर्ते हत्यारं घेऊन का आले होते?- उदय सामंत
काही लोकांनी रोष प्रकट करीत सामंत यांच्या गाडीवर हल्ला चढविला. हल्लेखोरांच्या हातात हत्यारं होती असे व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावेळी सामंत यांनी सवाल केला की, सभेला आलेले कार्यकर्ते हत्यारं घेऊन का आले होते?
शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर काल पुणे येथे हल्ला झाला होता. या सर्व प्रकारावर उदय सामंत यांनी TV9 मराठीला प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण संपल्यानंतर ते त्यांच्या ताफ्यासह समोर निघाले. त्यांच्याच मागोमाग उदय सामंत देखील निघाले. कात्रजच्या समोर एका सिग्नलवर गाडी थांबल्यानंतर शेकडो कार्यकर्ते उदय सामंत यांच्या गाडीभवती जमा झाले होते. हे ठिकाण सभा स्थळापासून जवळच होते. काही लोकांनी रोष प्रकट करीत सामंत यांच्या गाडीवर हल्ला चढविला. हल्लेखोरांच्या हातात हत्यारं होती असे व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावेळी सामंत यांनी सवाल केला की, सभेला आलेले कार्यकर्ते हत्यारं घेऊन का आले होते?
Published on: Aug 03, 2022 12:24 PM