Udayan Raje Bhosale | खासदार उदयनराजे भोसले यांचं लॉकडाऊन विरोधात कटोरा घेऊन आंदोलन

Udayan Raje Bhosale | खासदार उदयनराजे भोसले यांचं लॉकडाऊन विरोधात कटोरा घेऊन आंदोलन

| Updated on: Apr 10, 2021 | 4:08 PM

राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास लोकं आणि मी ऐकणार नाही. उद्यापासून लॉकडाऊन (Lockdown) उठला पाहिजे. त्यानंतरही शासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास तो आम्हाला मान्य नाही. यावरून मारामारी किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण त्यासाठी सरकार जबाबदार असेल. लोकं पोलिसांना चोपून काढतील, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला. खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी साताऱ्यातील पोवईनाक्यावर लॉकडाऊनविरोधात आंदोलन केले. हातात कटोरा घेऊन ते फुटपाथवर बसले होते. या प्रतिकात्मक आंदोलनानंतर उदयनराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Washim | वाशिममध्ये लॉकडाऊनला नागरिकांचा प्रतिसाद, विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई
Nagpur | नागपुरात लॉकडाऊनला प्रतिसाद नसल्याने पोलीस रस्त्यावर