Udayan Raje Bhosale यांनी पुस्तकं विकणाऱ्या मुलीकडून सगळे पुस्तके विकत घेत दिलदारपणा दाखवला
उदयनराजे भावुक होतात आणि ते त्या मुलीकडे असलेली सगळे कॅलेंडर आणि पुस्तकं विकत घेतात. इतकंच काय तर विकत घेतलेली सगळी पुस्तकं आणि कॅलेंडर ते आपल्या कार्यकर्त्यांना अनाथालयात पाठवायला सांगतात. म्हणजे एक नाही दोन चांगली कामं. आता हा व्हिडीओ साताराच काय संपूर्ण महाराष्ट्रात वायरल होतोय.
सातारा: खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असतात. अहो नुसते चर्चेत काय त्यांचे कायमच व्हिडीओ वायरल (Viral Video) होत असतात. कधी डायलॉगबाजी, कधी डान्स, कधी काय तर कधी काय…राजकारणी माणूस (Politician), एका राजघराण्याचा माणूस आणि लोकांच्या मनावर राज करणारा माणूस या सगळ्या वेगवेगळ्या बाजू सांभाळताना खासदार उदयनराजे भोसले चांगला माणूस व्हायला विसरत नाहीत.असाच एक व्हिडीओ वायरल झालाय. ज्यात खासदार उदयनराजे एका पुस्तकं विकणाऱ्या मुलीकडून सगळी पुस्तके विकत घेताना दिसत आहेत. एक मुलगी रस्त्यावर पुस्तकं विकत होती. उदयनराजेंनी गाडी थांबवली आणि त्या मुलीकडील सर्व पुस्तकं एका दमात विकत घेतली. इतकंच काय पुस्तकं विकत घेतल्यानंतर ती अनाथालयातल्या मुलांना द्यायलाही सांगितली. आता हाच व्हिडीओ वायरल होतोय. लोकांनी अक्षरशः खासदार उदयनराजेंवर कौतुकाचा वर्षाव सुरु केलाय.