निवडणूक रोख्यातून भाजपाचे बिंग फुटल्याने केजरीवाल यांना अटक, उद्धव ठाकरे यांचा आरोप

| Updated on: Mar 31, 2024 | 2:22 PM

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात इंडिया आघाडी एकत्र आली आहे. इंडिया आघाडीने आता दिल्लीतील रामलीला मैदान केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी रॅली बोलावली आहे. या रॅलीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हजेली लावीत भाजपावर जोरदार टीका केली आहे.

दिल्ली : लोकसभा निवडणूकांच्या तोंडावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. त्यामुळे भाजपाच्या विरोधात इंडिया आघाडीने दिल्लीतील रामलीला मैदानात रॅली बोलावली आहे. या रॅलीसाठी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीला गेले आहेत. दिल्लीला गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपावर तोफ डागली आहे. निवडणूक रोख्यांतून आपले बिंग बाहेर आल्याने लक्ष विचलित करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडी मार्फत अटक केल्याचा आरोप शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी केला आहे. या निवडणूक रोख्यातील भाजपा हा सर्वात मोठा लाभार्थी आहे. भाजपाने एकतर धाडी टाकून या कंपन्यांना निवडणूक रोखे खरेदी करायला भाग पाडले किंवा निवडणूक रोखे खरेदी केल्यानंतर त्या कंपन्यांना विविध कंत्राटे वाटल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

 

Published on: Mar 31, 2024 02:19 PM
ठाणे आणि कल्याणचे सुभेदार कोण ? महायुतीने घेतला हा निर्णय
आमच्या आईला भाजपनं… सुनेत्रा पवारांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?