सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर ठाकरे घराणे…
सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत असलेली टीका ठाकरे घराणे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर करण्यात येत आहे. त्यामुळे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी होताना दिसत आहे.
शिंदे-फडणवीस सरकारच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या घोषणेबाजीमुळे तापण्याची शक्यता आहे. शिंदे-फडणवीस सरकारचे सुरू असलेले पावसाळी अधिवेशन पहिल्याच दिवसांपासून वादळी ठरले आहे. कधी सत्ताधारी तर कधी विरोधकांकडून विधान सभेच्या पायऱ्यांवर बसून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे. आज सत्ताधाऱ्यांकडूनच विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या 50 खोक्यांच्या टीकेला प्रत्त्युत्तर देताना सचिन ओझेचे खोक मातोश्री ओके अशी टीका करण्यात येत आहे. सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत असलेली टीका ठाकरे घराणे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर करण्यात येत आहे. त्यामुळे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी होताना दिसत आहे.
Published on: Aug 25, 2022 11:12 AM