ठाकरे-आंबेडकरांसोबत औरंगजेबाचा फोटो, मुंबईतील बॅनरबाजीमुळे खळबळ!

| Updated on: Jun 23, 2023 | 8:51 AM

माहीम परिसरात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर आणि औरंगजेबाचा फोटो असलेला बॅनर लावला आहे. या बॅनरमुळे आता एकच खळबळ माजली आहे. मध्यरात्री अज्ञातांनी बॅनर लावले असून स्थानिक शिवसैनिकांनी तात्काळ हा बॅनर हटवले आहेत.

मुंबई : माहीम परिसरात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर आणि औरंगजेबाचा फोटो असलेला बॅनर लावला आहे. या बॅनरमुळे आता एकच खळबळ माजली आहे. मध्यरात्री अज्ञातांनी बॅनर लावले असून स्थानिक शिवसैनिकांनी तात्काळ हा बॅनर हटवले आहेत. अशा प्रकारामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो असं सांगितलं जात आहे.या बॅनर्सची शिवसैनिकांनी किंवा इतर कुणाची पोलिसात तक्रार दाखल केली नसली तरी पोलीस स्वत:हून अज्ञात व्यक्ती विरोधात एफआयआर दाखल करणार आहेत. तशी माहिती डीसीपींनी दिली आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही डीसीपीने दिला आहे. नेमकं या बॅनरवर काय लिहिलं आहे, यासाठी पाहा यासंदर्भातील व्हिडीओ…

Published on: Jun 23, 2023 08:51 AM
Special Report : वंचितची ठाकरे गटासोबत युती तरी संजय राऊत यांना शंका? नेमकं प्रकरण काय?
“…तर उद्धव ठाकरे औरंगजेबाच्या दर्शनासाठी कधी जाणार?”, मुंबईतील बॅनरबाजीवरून भाजप नेत्याची टीका