अमित शाहांच्या ‘त्या’ चार प्रश्नांना उद्धव ठाकरे याचं सडेतोड प्रत्यत्तुर; म्हणाले, ‘…तुम्ही आम्हाला…’
मुस्लीम आरक्षण, तीन तलाक, समान नागरी कायदा, राम मंदिर यावर उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असं अमित शाहांनी म्हटलं होतं. याला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या कार्यकर्त्यांचं शिबीर मुंबईत पार पडलं.
मुंबई : काही दिवसांपूर्वी मराठवाड्यात झालेल्या सभेत अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना चार प्रश्न विचारले होते. मुस्लीम आरक्षण, तीन तलाक, समान नागरी कायदा, राम मंदिर यावर उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असं अमित शाहांनी म्हटलं होतं. याला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या कार्यकर्त्यांचं शिबीर मुंबईत पार पडलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं. यावेळी त्यांनी, तुम्हाला कुणी अदानीवर प्रश्न विचारला, तर तुमची बोबडी वळते. तुम्ही राहुल गांधींना घराबाहेर काढता, आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारणार का?, असं सवाल ठाकरेंनी केला आहे. तर समान नागरी कायदा आणा आमचा पाठिंबा आहे. संपूर्ण देशभरात गोवंश बंदी कायदा आणू शकत नाही, समान नागरी कायदा काय आणणार? असाही परखड सवाल करत आम्ही असताना महाराष्ट्रात हिंदू-मुस्लिम दंगली का झाल्या नाहीत? आणि आता त्या कशा होतात? तर येथे हिंदू जनआक्रोश करण्यापेक्षा काश्मीर आणि मणिपूरमध्ये जाऊन करा, तिकडेही हिंदूच मरत आहेत, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली आहे.