अजित पवार यांची भेट का घेतली? उद्धव ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “जनतेला न्याय…”
ठाकरे गटचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उचांवल्या. उद्धव ठाकरे यांनी विधानभवनातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली.
मुंबई, 20 जुलै 2023 | ठाकरे गटचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उचांवल्या. उद्धव ठाकरे यांनी विधानभवनातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “अजित पवार हे अडीच वर्षे माझ्या बरोबर होते. मला खात्री आहे की सत्तेचे डावपेच इतर लोकांकडून सुरु असले तरीही अजित पवारांकडून जनतेला मदत होईल. कारण राज्याच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे दिल्या गेल्या आहेत परत त्यामुळे हे शक्य आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.”
Published on: Jul 20, 2023 08:00 AM