उद्धव ठाकरे यांचा शिंदे-फडणवीस सरकार विरोधात एल्गार, मुंबई महापालिकेवर महामोर्चा काढणार!
दादर येथील शिवसेना भवनमध्ये उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांची बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबई महापालिकेच्या पैशांची सध्या लुटालुट चालू असल्याचा आरोप केला आहे.
मुंबई : दादर येथील शिवसेना भवनमध्ये उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांची बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबई महापालिकेच्या पैशांची सध्या लुटालुट चालू असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, राज्यातील महापालिकांच्या निवडणूका पावसाप्रमाणे लांबत चालल्या आहेत. जाब विचारणारे कुणी नाही, अशाप्रकारे शिंदे सरकारचा उधळपट्टी कारभार सुरु आहे. वारेमाप पैसा उधळला जातोय. G – 20 च्या नावाने लुटालूट सुरु आहे. हा जनतेचा पैसा आहे आणि या जनतेच्या पैशाची लूट, त्याचा हिशोब जनतेला द्यावाच लागेल. त्या हिशोबाचा जाब विचारण्यासाठी शिवसेना मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहे अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
Published on: Jun 20, 2023 04:11 PM