Ujjwal Nikam | सत्ता संघर्षाबाबत उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया

| Updated on: Mar 14, 2023 | 11:30 AM

सुप्रीम सुनावणी पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यावर जेष्ठ विधी तज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे

मुंबई : उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सुरू झालेला राजकीय वाद आज सत्तासंघर्षाद्वारे सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. त्याच्यावर सुप्रीम सुनावणी पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यावर जेष्ठ विधी तज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निकम यांनी, शिंदे गटाचे वकिल हरीश साळवे यांनी मागच्या सुनावणीत न्यायालयांना नैतिकता अनैतिकता यामध्ये न पडता तथ्यांच्या आधारे निर्णय द्यावा असे म्हटले होते. ही बाब लोकशाहीच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट महत्वाची आहे. त्यांच्या या युतीवादामध्ये बरंच काही तथ्य आहे. आजही ते युक्तीवाद करतील. पण या युक्तीवादात काय असेल हे पाहणे महत्वाचं ठरणार असल्याचे निकम म्हणाले.

Published on: Mar 14, 2023 11:24 AM
Video : राज्यातील सत्तासंघर्षावर दोन दिवसात निकाल येणार? पाहा सविस्तर…
शिंदेगट आधी बाप पळवत होता, आता मुलंही पळवायला लागले!; संजय राऊत बरसले