सभेआधीच शिरसाट यांचा ठाकरेंवर हल्लाबोल; अपक्षांवरून केले आरोप, गडाखांच्या नावाचा उल्लेख

| Updated on: Apr 02, 2023 | 1:00 PM

शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये अपक्षांना का स्थान दिलं? बहुमत असताना, शिवसेनेतच अनेक आमदार असताना 1 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री पदे अपक्षांना का दिली असा सवाल केला आहे

छत्रपती संभाजीनगर : उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शिवसेनेवरून संघर्ष शुरू आहे. शिवसेवेत फुट पडली आणि नव्या शिंदे गटात 40 आमदार गेले. तेव्हा पासून ठाकरे, संजय राऊत आणि शिवसेनेतील नेते शिंदे गटावर गद्दार, खोके असे शब्द वापरत टीका करत असतात. यावरून शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये अपक्षांना का स्थान दिलं? बहुमत असताना, शिवसेनेतच अनेक आमदार असताना 1 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री पदे अपक्षांना का दिली असा सवाल केला आहे. त्याचबरोबर आजच्या सभेत ठाकरे यांनी देवाची शपथ, स्वर्गीय बाळासाहेब यांची शपथ घेऊ एकदा सांगून टाकावे की शंकरराव गडाख यांना मंत्री पद का दिलं? त्यांनी सेनेच्या एका तरी बैठकीला हजेरी लावली का? मग त्यांच्यावर ठाकरेंनी महेरबानी का दाखवली. त्यांना मंत्रीपद देण्यासाठी किती खोके घेतले. सांगून टाका एकही रुपया घेतला नाही आणि गडाखांना कॅबिनेट मंत्री केलं. सांगा एकदा जनतेला.

Published on: Apr 02, 2023 12:54 PM
‘त्याला’ रेड्याचं दुध काढायचं माहित आहे; राऊतांवर शिवसेना नेत्याकडून पलटवार
मविआची सभा तर सावरकर गौरव यात्रेवरून जयंत पाटील यांचं वक्तव्य, म्हणाले…