‘पक्षाला गळती कधी लागत नाही, कार्यकर्ते घडत असतात’ : सुनील प्रभू
वरळीतील एका माजी नगरसेवकाने देखील ठाकरे यांचा हात सोडत शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतला. यावर उद्धव ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू आपली प्रतिक्रिया दिली
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला गळती लागली असून अनेक आजी माजी नेते आणि कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जात आहेत. तर वरळीतील एका माजी नगरसेवकाने देखील ठाकरे यांचा हात सोडत शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतला. यावर उद्धव ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, पक्षाला गळती लागत नाही. कार्यकर्ते हे घडत असतात. उद्धव ठाकरे यांच्याकडे संघटनात्मक आहे. आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावावरती लाखो कार्यकर्त्यांना एकत्र करत पुन्हा एकदा महाराष्ट्रात चमत्कार घडवू असे म्हटलं आहे. त्याचबरोबर भाजपचे आमदार रमेश पाटील यांनी केलेलं विधान म्हणजे सत्तेचा माज आहे. अती तेथे माती. ज्याप्रमाणे आज हे भाजपचे लोक बोलत आहेत. ते लोकशाहीला घातक आहे. लोक यांना उत्तर मतदानातून देतील.
Published on: Mar 17, 2023 12:36 PM