“भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजप पक्ष वाढवावा; ही भाजपची नीती”, अमरावतीत उद्धव ठाकरे यांचा घणाघात

| Updated on: Jul 11, 2023 | 10:26 AM

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजपवर घणाघाती हल्ला चढवला.

अमरावती : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजपवर घणाघाती हल्ला चढवला. ते म्हणाले की, “मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, असं रामदास स्वामी म्हणायचे. पण भाजपचं वेगळंच आहे. भ्रष्ट तितुका मेळावावा, भाजप पक्ष वाढवावा, असं भाजपचं सुरू आहे. कुणाच्या कार्याच्या कर्तृत्वाचं काही नाही. कुत्रं पकडण्याची गाडी असते. दिसला कुत्रा तर पकडला जातो. तसं दिसला भ्रष्टाचारी की टाकला गाडीत, असं आज सुरू आहे. नंतर वॉशिंग मशीनमध्ये टाकलं जातं. मला भाजपची चिंता नाहीये. निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देऊ शकते. पण…”, उद्धव ठाकरे पुढे काय म्हणाले यासाठी पाहा हा व्हिडीओ…

Published on: Jul 11, 2023 10:26 AM
Special Report | उद्धव ठाकरे यांचा भाजपसह शिंदे गटाला आव्हान, म्हणाले, ‘मर्दाची अवलात’
“गिरीश महाजन आता तीन पक्षाचं सरकार, यापुढे राष्ट्रवादीचे झेंडे…”, अजित पवार यांनी बोलून दाखवली ‘ही’ नाराजी