“सर्वाधिक ताकदवान पंतप्रधान मोदी, मग इतर पक्ष फोडण्याची वेळ का आली?”, उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल
ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. काल यवतमाळमध्ये शिवसैनिकांशी संवाद साधल्यानंतर उद्धव ठाकरे आज अमरावतीत आले आहेत. अमरावतीत त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला.
अमरावती : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. काल यवतमाळमध्ये शिवसैनिकांशी संवाद साधल्यानंतर उद्धव ठाकरे आज अमरावतीत आले आहेत. अमरावतीत त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, “जगातील सर्वात मोठा पक्ष, जगातले नंबरचे एकचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असताना दुसऱ्याचे पक्ष फोडावे लागत आहे. देशातील सर्व विकून दुसऱ्या पक्षांतील लोकांना विकत घेण्याची भाजपवर का वेळ आली? भाजपला सत्तेची मस्ती आहे. हातात सर्व यंत्रणा असतानाही भाजपला जिंकून येण्याचा आत्मविश्वास राहिला नाही. यातून विरोधकांना संपवण्याचा डाव भाजपचा आहे. भाजप हा राजकारणातील नामर्द आहे.”
Published on: Jul 10, 2023 02:34 PM