एक चोरला, दुसरा चोरला, आता मस्टरमंत्री रहाणार का? उद्धव ठाकरे यांची कुणावर खोचक टीका?
एक पक्ष चोरला दुसरा चोरला आता किती घेणार आहात? तिकडे जर एवढे घेतले? अजित पवार उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, आता काँग्रेसला फोडून आणखी एक उपमुख्यमंत्री, किती उपमुख्यमंत्री करणार आहात?
मुंबई । 6 ऑगस्ट 2023 : इंडियाची (INDIA) बैठक होतेय त्यावर टीका होतेय. पण मला मोदीजींना एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही बाहेर जाता तेव्हा इंडियाचे पंतप्रधान म्हणून जाता की इंडियन मुजाहिदीनचे पंतप्रधान म्हणून जाता? जे घराणेशाही बद्दल बोलत आहेत त्यांचे कोणी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात होते का? घराणेशाहीचा इतिहास काढता तसा हा ही इतिहास काढा. तुमच्या पूर्वजांपैकी कुणी त्यात होते का? इतिहासाची मढी उकरून काढता तेव्हा काय निघतं, हाड ? अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली. भाजपने एक पक्ष चोरला, दुसरा पक्ष चोरला, आता म्हणे तिसरा घेणार आहेत. काँग्रेसपण फोडणार आहे असं ऐकायला मिळतंय. तिकडे जे गेले ते उंटदेखील आहेत आणि गाढवंदेखील आहेत. मला देवेंद्रजी यांची दया येते. एक पक्ष चोरला दुसरा चोरला आता किती घेणार आहात? तिकडे जर एवढे घेतले? अजित पवार उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, आता काँग्रेसला फोडून आणखी एक उपमुख्यमंत्री, किती उपमुख्यमंत्री करणार आहात? इतके सगळे उपमुख्यमंत्री असल्यावर देवेंद्र हे केवळ मस्टर मंत्री म्हणून राहणार आहेत का? असा खरमरीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.