‘…तेव्हा बाळासाहेबांनी हात दिला, पण…’; उद्धव ठाकरे यांच्याकडून भाजपचा खरपूस समाचार

| Updated on: Aug 07, 2023 | 7:50 AM

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या संयुक्त मेळाव्यात बोलताना ठाकरे यांनी भाजप ही टीका केली. यावेळी त्यांनी, आपल्या देशावर पुन्हा गुलामगिरी आणणारी वृत्त हद्दपार करायची आहे. माझे मोदी काही शस्त्रू नाहीत.

मुंबई, 7 ऑगस्ट 2023 | ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाजपवर सडकून टीका केली. संपूर्ण भाजप एकत्र आला तरी ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना रोखू शकत नाहीत, असा घणाघात त्यांनी केला. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या संयुक्त मेळाव्यात बोलताना ठाकरे यांनी भाजप ही टीका केली. यावेळी त्यांनी, आपल्या देशावर पुन्हा गुलामगिरी आणणारी वृत्त हद्दपार करायची आहे. माझे मोदी काही शस्त्रू नाहीत. आजही मी त्यांना नरेंद्र भाई म्हणतो. पण ते ही मनातल्या मनात. कारण आता त्यांच्याशी संपर्क नाही. माझं वैयक्तिक भांडण नाही. किंवा वेळ जात नाही म्हणून वादही उकरून काढत नाही. पण आता जीव जळतो. शिवसेना काय, भाजप काय जेव्हा देशाच्या राज्यात अस्पृश्य होते. जवळ कोणीच घेत नव्हतं त्यावेळी बाळासाहेबांनी हात दिला सोबत घेतलं आणि पुढे नेले. आम्ही मिठी मारली होती. पण तुम्ही पाठीवर वार केलेत अशीही टीका केली आहे.

Published on: Aug 07, 2023 07:50 AM
वर्सोवा समुद्रात बोट उलटली, मासेमारीसाठी मच्छिमार खोल समुद्रात गेले, अन्…
चिखलातून बैलांच्या खिल्लारी जोडी पळावल्या; पाहा कोकणातील नांगरणीच्या स्पर्धेची खास ड्रोन दृश्ये