‘एक फूल दोन हाफला आंदोलनाची कल्पना नव्हती का ?’ , उद्धव ठाकरे यांचा सवाल

| Updated on: Sep 02, 2023 | 3:10 PM

ज्या कोरोनाकाळात जीवाची बाजी लावली ते पोलीस एवढे राक्षस होऊ शकतात का, असंही ठाकरे यांनी म्हंटलं. सरकार बदलल्यावर पोलीस राक्षस कसे होतील. याचा अर्थ याच्या पाठीमागे आदेश देणारा कोणीतही आहे.

मुंबई, २ सप्टेंबर २०२३ : उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, आमच्याविरोधात बोलायला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना वेळ आहे. पण, आंदोलकांना भेटायला जावं, असं एकाही मंत्र्याला वाटलं नाही. एक फूल दोन हापमधला कुणीही गेला नाही. आता चौकशीचा फार्स केला जात आहे. जे झालं त्याची सखोल चौकशी केली जाईल. किती खोल जाणार तुम्ही एवढे खोल जाणार की, वरच येणार नाही तुम्ही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना लगावला. चौकशीचं थोतांड कशाला करता. प्रत्येक मुख्यमंत्र्याला, गृहमंत्र्याला कुठं काय चाललं याची कल्पना दिली जाते. कोण मोर्चे काढतो, कोणाचं काय म्हणणं आहे. एक फूल दोन हाफला आंदोलन चाललं आहे, हे माहिती नव्हतं काय? बारसूमध्ये सुद्धा महिलांना मारहाण झाली. वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला. अजून चौकशा सुरू आहेत. ज्या कोरोनाकाळात जीवाची बाजी लावली ते पोलीस एवढे राक्षस होऊ शकतात का, असंही ठाकरे यांनी म्हंटलं. सरकार बदलल्यावर पोलीस राक्षस कसे होतील. याचा अर्थ याच्या पाठीमागे आदेश देणारा कोणीतही आहे. तुमच्या आदेशाशिवाय पोलीस असे कसे वागू शकतात.

 

Published on: Sep 02, 2023 03:09 PM
Rohit Pawar on lathi charge : ज्यांनी लाठीचार्जचे आदेश दिले त्यांनी पदावरून रिक्त व्हावे, आमदार रोहित पवार यांनी सांगितला तो प्रसंग
Prabhani News | जालना लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ मराठा समाजाकडून बंदची हाक