‘आमचं हिंदुत्व हे मुह में राम आणि हाताला काम’; ठाकरे यांचा भाजपच्या हिंदुत्वावरून प्रहार
यावेळी ठाकरे यांनी भाजपच्या हिंदुत्वावरून टीका करताना, त्यांचे हिंदुत्व हे चूल पेटवणारे नाही तर घर पेटवणारे आहे. त्यांनी घरच पेटवायची आहेत. तर भाजपवाल्यांचं मुहमे राम आणि बगल मे छूरी असं आहे. नुसतं राम राम म्हणायचं आणि मारतं सुटायचं असं आमचं हिंदुत्व नाही.
नागपूर : उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल सोमवारी भाजपचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी त्यांनी शिंदे गटावर देखील हिंदुत्वावरून चांगलीच टीका केली. यावेळी ठाकरे यांनी भाजपच्या हिंदुत्वावरून टीका करताना, त्यांचे हिंदुत्व हे चूल पेटवणारे नाही तर घर पेटवणारे आहे. त्यांनी घरच पेटवायची आहेत. तर भाजपवाल्यांचं मुहमे राम आणि बगल मे छूरी असं आहे. नुसतं राम राम म्हणायचं आणि मारतं सुटायचं असं आमचं हिंदुत्व नाही. आमचं हिंदुत्व हे मुह में राम आणि हाताला काम असे आहे. मात्र ज्यांनी वाढवलं मोठं केलं आज हे भाजपवाले त्यांनाच मिटवायला निघालेत. यांची मजल आता बाळासाहेबांपर्यंत गेली आहे. ते कोश्यारी तर गेलेच. बरं झालं ते पार्सल गेलं अशी घणाघाती टीका ठाकरे यांनी तात्कालिन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली. तर कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला. त्यावेळी हे मिंधे तिथे शेपूट घालून बसले होते. तर आम्ही त्यांना समज दिल्याचे बोलत होते असा टोला देखील ठाकरे यांनी शिंदे गटाला लगावला आहे.