‘‘इंडिया’त नेतृत्वाची स्वप्न पाहणारं कोणी नाही, प्राथमिकता ही लोकशाही…’; नेता निवडणीवर ठाकरे यांचे वक्तव्य

| Updated on: Jul 27, 2023 | 9:46 AM

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाज कुणाचा या पॉडकास्ट मुलाखतीचा आज दुसरा भाग प्रदर्शिक झाला. यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.

मुंबई | 26 जुलै 2023 : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाज कुणाचा या पॉडकास्ट मुलाखतीचा आज दुसरा भाग प्रदर्शिक झाला. यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर स्पष्ट बोलताना पहिल्यांदाच अजित पवार यांच्यावर टीका केली. तर भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडताना आपली भीती का वाटतेय असा सवाल केला. याचदरम्यान केंद्रातील महाविकास आघाडी ज्याचे नाव आता ‘इंडिया’ करण्यात आलं आहे. त्याला अजूनही नेता नाही यावरूही टीका होत असल्यावरून आणि विचोरलेला प्रश्नाला आज त्यांनी रोखठोक उत्तर दिलं. यावेळी ठाकरे यांनी, महाविकास आघाडीची व्याप्ती आता वाढलेली आहे आणि त्यात देशातील विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. तर आता त्याचे नाव आता बदलून ‘इंडिया’असे करण्यात आले आहे. तर काँग्रेस हा मोठा पक्ष आणि महत्वाचा पक्ष आहे. मात्र अजूनही नेता ठरलेला नाही. त्यावर देशातील विरोधी पक्ष एकत्र आल्याने सध्या सगळेच जमिनीवर असून ही लढाई केवळ कोणत्या राजकीय पक्षाच्या अस्तित्वाची नाही, देशाच्या लोकशाहीची आणि देशाच्या स्वातंत्र्याची आहे. त्यामुळे नेता व्हावं अशी अपेक्षा कोणत्याचं पक्षाची नाही असे त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Jul 27, 2023 09:46 AM
शिवसेनेतले फुटीर जर मातोश्रीवर आले तर..? उद्धव ठाकरे म्हणाले…
 ‘हिंदुत्व, भाजप अन् कलम ३७०’, उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीतून भाजपला थेट सुनावलं