माजी मंत्री आणि भाजपच्या हेविवेट नेत्याला उद्धव ठाकरे यांचा दे धक्का, या नेत्याच्या पुतण्याला दिला पक्षप्रवेश
उद्धव ठाकरे यांनी साजन पाचपुते यांच्या हाती शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. साजन पाचपुते यांच्या उद्धव ठाकरे गटातील पक्षप्रवेश हा श्रीगोंदाचे भाजप आमदार बबनराव पाचपुते यांना मोठा धक्का मानला जात आहे. साजन पाचपुते हे काष्टी गावचे विद्यमान सरपंच आहेत.
अहमदनगर : 4 सप्टेंबर 2023 | एकेकाळी शरद पवार यांचे निष्ठावंत असलेले माजी मंत्री आणि विद्यमान भाजप आमदार बबनराव पाचपुते यांच्या कुटुंबात काका पुतण्याचे राजकारण सुरू झाले आहे. बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते यांनी आज मातोश्री निवासस्थानी ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. उद्धव ठाकरे यांनी साजन पाचपुते यांच्या हाती शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. साजन पाचपुते यांच्या उद्धव ठाकरे गटातील पक्षप्रवेश हा श्रीगोंदाचे भाजप आमदार बबनराव पाचपुते यांना मोठा धक्का मानला जात आहे. साजन पाचपुते हे काष्टी गावचे विद्यमान सरपंच आहेत. सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत साजन यांनी बबनराव पाचपुते यांचा मुलगा प्रतापसिंह बबनराव पाचपुते यांचा पराभव केला होता. काही दिवसांपूर्वी साजन पाचपुते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शंदे यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते शिंदे गटात जाणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, पाचपुते यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. आगामी विधानसभा निवडणुकीत श्रीगोंदा मतदारसंघात काका – पुतणे यांच्यात लढत झाल्याचे पहावयास मिळणार का? याची उत्सुकता आहे.