शिंदे रडणारे नाही तर लढणारे नेते; भुमरेंचा आदित्य ठाकरेंवर पलटवार
स्वतःचे पाप झाकण्यासाठी आदित्य ठाकरे हे शिंदे यांच्यावर आरोप करत आहेत. शिंदे यांनी मातोश्रीवर जाऊन रडण्याचा काहीही संबंध नाही. आदित्य ठाकरे अडीच वर्षे मंत्री होते पण एकही ठिकाणी जाऊन उद्घाटन केलं नाही. त्यावेळी निष्क्रिय सरकार होतं
छ. संभाजीनगर : उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गौप्यस्फोट केला. त्यावरून आता शिंदे गट आक्रमक झाला आहे. शिंदे गटातील नेत्यांकडून आदित्य ठाकरे यांच्यावर टीका होताना दिसत आहे. आताही छ. संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रडणारे नाही तर लढणारे नेते आहेत. तर स्वतःचे पाप झाकण्यासाठी आदित्य ठाकरे हे शिंदे यांच्यावर आरोप करत आहेत. शिंदे यांनी मातोश्रीवर जाऊन रडण्याचा काहीही संबंध नाही. आदित्य ठाकरे अडीच वर्षे मंत्री होते पण एकही ठिकाणी जाऊन उद्घाटन केलं नाही. त्यावेळी निष्क्रिय सरकार होतं. पण आता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस नऊ महिने इतकी कामं केली आहेत. जेवढी मागील अडीच वर्षात झाली नाहीत. त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांच्याकडे आरोप, टीका करण्याशिवाय काही काम उरलेलं नाही अशी टीका भुमरे यांनी केली आहे.