‘हे शासन आहे की दुष्याशन?’ शिवसेना नेत्याचा महिला सुरक्षिततेवरून सरकारवर घणाघात
आज नीलम गोऱ्हे, किरीट सोमय्यांच्या कथित व्हिडीओ क्लिप प्रकरणावरून अधिवेशानात आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळेल. मात्र याच्या आधी आज विधान भवनाच्या बाहेर जोरदार घोषणा देण्यात आल्या.
मुंबई, 19 जुलै 2023 | राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशाच्या तिसऱ्या दिवसाआधी विरोधकांकडून विविध प्रश्नांवर आज सरकारची आडवणूक होण्याची शक्यता आहे. आज नीलम गोऱ्हे, किरीट सोमय्यांच्या कथित व्हिडीओ क्लिप प्रकरणावरून अधिवेशानात आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळेल. मात्र याच्या आधी आज विधान भवनाच्या बाहेर जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी विरोधक आक्रमक होत आंदोलन केलं. यावेळी महिलांवर अत्याचार करणाऱ्या सरकाचा धिक्कार असो, सोमय्या यांना सुरक्षा देणाऱ्या सरकारच्या धिक्कार असो, अशाही घोषणा देण्यात आल्या. याचवेळी उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार सचिन आहिर यांनी राज्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारावरून सरकारला धारेवर धरत टीका केली. त्यांनी मुंबईतील सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका विद्यार्थीची खून झाला. त्यावरून संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवध गुन्हा दाखल व्हायला हवा होता. पण तो झालेला नाही. त्यासाठी आम्ही आवाज उठवतच राहू. तर या मुंबईत महिला सुरक्षित नाहीत तर बाकी राज्यात काय बोलणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तर हे शासन आहे की दुष्याशन असा प्रश्न पडल्याचे त्यांनी म्हटलं आहे.