साळवी कुटुंबीयांची चौकशी पुढे ढकलली; काय आहे नेमकं कारण
आमदार सावळी हे आज आपल्या कुटुंबासह अलिबाग एसीबी समोर हजर राहणार होते. मात्र आता यात नवा ट्विस्ट आल्याने साळवी आता चौकशीला जाणार नाहीत.
मुंबई : उद्धव ठाकरे गटाला एका मागून एक धक्के बसत असतानाच. आमदार राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबीयांची एसीबीने चौकशीचे आदेश काढले. यामुळे ठाकरे गटात कमालीचे चिंतेचे वारे पसरले. यादरम्यान सावळी हे आज आपल्या कुटुंबासह अलिबाग एसीबी समोर हजर राहणार होते. मात्र आता यात नवा ट्विस्ट आल्याने साळवी आता चौकशीला जाणार नाहीत.
आमदार राजन सावळी त्यांचे कुटुंब एसीबी समोर चौकशीला जाणार होते. मात्र एसीबी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या व्यस्त शेड्युलमुळे साळवी कुटुंबीयांची चौकशी पुढे ढकलण्यात आली आहे. अलिबागच्या एसीबी कार्यालयातून राजन साळवी यांना आज येऊ नका असा फोन आला होता. तर आताही चौकशी एप्रिल महिन्यातील 3 किंवा 4 तारखेला होईल.
Published on: Mar 24, 2023 02:37 PM