कंबोज यांचा ‘तो’ दावा भाजप नेत्यानेच खोडून काढला, म्हणाले ते तसं नाही…
कंबोज यांनी दाखवलेलं बील आपल्याला पटलेलं नाही असं म्हटलं आहे. त्याचबरोबर ठाकरे कुटुंबीयांवर टीका करताना, उद्धव ठाकरे किंवा त्यांची फॅमिली ही कुठलही बिल पेड करत नाहीत.
मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते मोहित कंबोज यांचा बारमधील व्हिडिओ शेअर करत विरोधकांना हिंदुत्वावरून चांगलाच टोला लगावला होता. त्यानंतर मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेत तेजस ठाकरे यांचा एक व्हीडिओ दाखवला आणि एक बीलही. ज्यावर पेड बाय तेजस ठाकरे असं होतं तर बील तब्बल 97,000 चं. त्यावरून भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी ठाकरे कुटुंबियांवर टीका केली आहे. तर कंबोज यांनी दाखवलेलं बील आपल्याला पटलेलं नाही असं म्हटलं आहे. त्याचबरोबर ठाकरे कुटुंबीयांवर टीका करताना, उद्धव ठाकरे किंवा त्यांची फॅमिली ही कुठलही बिल पेड करत नाहीत. कोणालाही पैसे देत नाहीत. ते खातात, शॉपिंग करतात आणि पैसे न देता जातात. तर त्यांनी बील दिलं असेल तर एकतरी बील दाखवावं. आम्ही अनेक वेळा त्यांच्याबरोबर जेवणासाठी बसलेला आहोत. त्यामुळे बील आणि उद्धव ठाकरे यांचा काहीही संबंध नाही.