पदवीवरून राऊतांचा भाजपवर हल्ला, म्हणाले, भाजप हा कारखाना
त्यांनी ट्विट करत पंतप्रधान यांच्यावर पदवीवरून निशाना साधत त्यांची डिग्री बोगस असल्याचे लोक म्हणतात असे म्हटलं आहे
मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत पंतप्रधान यांच्यावर पदवीवरून निशाना साधत त्यांची डिग्री बोगस असल्याचे लोक म्हणतात असे म्हटलं आहे. तर त्यांची डिग्री ही ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पदवी आहे. ती फ्रेम करून नवीन संसद भवनाच्या मुख्य गेटवर लावायला हवी असा टोला लगावला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी डिग्रीवरून भाजपला डिवचले आहे. तर बोगस डिग्रीचा कारखाना असे म्हणत भाजपवर टीका केली आहे. भाजपमधील फक्त 10 लोकांच्या डिग्री तपासा त्या बोगस असतील असेही ते म्हणाले.
Published on: Apr 03, 2023 11:46 AM