फडणवीस यांनी म्हटल्या प्रमाणे तर होत नाही ना! आता पुन्हा पटोले यांनी राऊत यांचा मुद्दा खोडून काढला
तर देवेंद्र फडणवीस यांनी, महाविकास आघाडीची अवस्था वाईट आहे. पहिला भोंगा सकाळी 9 वाजता वाजतो. त्याविरोधात दुसरा भोंगा दुपारी 12 आणि सायंकाळी तिसरा भोंगा पहिल्या दोघांनाही खोडून काढतो, असे म्हटलं होतं
नागपूर : उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाना साधत ट्विट केलं होतं. तसेच त्यांनी त्या ट्विटमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक करताना नागपूर बदलत आहे. बदल स्पष्ट दिसतोय. याचे बरेचसे श्रेय नितिन गडकरी यांना द्यावे लागेल असे म्हटलं होतं. त्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी नागपूरच्या विकासावरून राऊत यांना सनसनाटी उत्तर देताना, आपण त्यांच्या वक्तव्यावर फार प्रतिक्रिया देत नसल्याचे म्हटलं आहे. त्याचबरोबर नागपूरच्या लोकांना काय अडचणी आहेत, किती कर द्यावा लागतो याबाबत राऊत यांनी नागपूरकरांना विचारावं असा टोला लगावला आहे. नागपुरात लुट सूरू आहे, हे संजय राऊत यांनी तपासावे मग विकास कळेल असेही राऊत यांना म्हटलं आहे.
तर देवेंद्र फडणवीस यांनी, महाविकास आघाडीची अवस्था वाईट आहे. पहिला भोंगा सकाळी 9 वाजता वाजतो. त्याविरोधात दुसरा भोंगा दुपारी 12 आणि सायंकाळी तिसरा भोंगा पहिल्या दोघांनाही खोडून काढतो, असे म्हटलं होतं